dr.satish best web design developer for mac

शेंद्री ग्रामपंचायत :

गडहिंग्लज तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं आमचं गाव म्हणजे शेंद्री. गाव तसे मोठे आहे. गावची वस्ती साधारणता 1907 लोकांची आहे. गावात सर्व सुखसोयी आहेत. शाळा आहे, हायस्कूल आहे. पिण्याची पाण्याची तसेच शेतीसाठी गावात दोन धरण बांधले आहेत. एकूण काय गावकरी खूप आनंदात आहेत. आजच्या पिढीमध्ये सर्वजन सुखी आहेत. या गावात श्री. सिद्धेश्वराचे भव्य असे मंदिर आहे. या व्यतिरिक्त श्री. दत्त मंदिर, मरगुबाई मंदिर, लक्ष्मी मंदिर, हनुमान मंदिर ही मंदिरे आहेत. तसेच या गावची श्री. सिद्धेश्वराची यात्रा म्हणजे असपासमध्ये सर्वात मोठी यात्रा असते. या देवाची यात्रा 5 वर्षातून एकदा होते. गावात शुद्धिकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीमधून ग‌ट‌र्स, रस्ते, ग्राम‌स‌चिवाल‌य‌ बांध‌काम‌, रिकाम्या जागेव‌र ब‌गीच्या क‌रणे, विहिरी, सांड‌पाणी प्रक‌ल्प‌, क्रीडा संकूल‌, वृ्क्ष‌ लाग‌व‌ड‌, सौर दिवे, क‌च‌रा-कुंड्या, सार्व‌ज‌निक‌ कार्याल‌य‌, गाव‌त‌लाव‌ बांध‌काम‌ क‌रणे इत्यादी कामे केली आहेत.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1964 साली झाली. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर आठ सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करून गावठाण क्षेत्रात व रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्यात आली आहेत.

सरपंच
श्री. शिवाजी सिध्दू राऊत

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करतो.

उपसरपंच
श्री. दयानंद पुंडलिक तोडकर

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. ए. एच. मुंडे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Shendri Grampanchayat
A/p - Shendri Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416502

CONTACTS
Phone :

Office :